आरोग्य चिंतन ऑक्टोबर 2020 अंक प्रसिद्ध झाला

    Date : 08-Oct-2020
|
गोस्वामी_1  H x 
आरोग्य चिंतन ऑक्टोबर 2020 अंक प्रसिद्ध झाला
 
आरोग्य चिंतन ऑक्टोबर 2020 अंक प्रसिद्ध झाला आरोग्य चिंतनचा ऑक्टोबर 2020 या महिन्याचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये विविध उपयुक्त लेखांचा समावेश आहे covid-19 च्या तपासणी बद्दल श्रीगुरुजी रुग्णालयाचे पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश चाकूरकर यांचा अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असा लेख आहे. त्याचबरोबर वेदना निवारणासाठी आयुर्वेदाचा उपयोग या विषयावर वैद्य एकनाथ कुलकर्णी यांचा लेख आहे, पित्तशामक गुलाबाचे आरोग्यदायी गुणधर्म वर्णन करणारा वैद्य विजय कुलकर्णी यांचा तर हळदीचे आरोग्यदायी उपयोग सांगणारा लेख वैद्य सौ नीलिमा राजगुरू यांनी या अंकात लिहीलेला आहे, त्याचप्रमाणे मानसोपचार तज्ञ डॉ.मुक्तेश दौंड यांनी आत्महत्या व आपण या विषयावर केलेले सविस्तर विवेचन देखील वाचकांना याच अंकात वाचायला मिळणार आहे तेव्हा आपण या मासिकाचे वर्गणीदार नसाल तर अवश्य या महिन्यापासून वार्षिक वर्गणीदार व्हा आणि या प्रबोधनाच्या चळवळीत आपला सहयोग द्या अशी आग्रहाची विनंती आहे.
संपादक - आरोग्य चिंतन.