करोना च्या काळात प्रतिकारशक्ती

    Date : 16-Jun-2020
|

img1_1  H x W:  
करोना च्या काळात प्रतिकारशक्ती वाढवताना अशी काळजी घ्या .
 
वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सक संपादक आरोग्य चिंतन नाशिक मोबाईल
 
 98 220 75 0 21 क रोण्याच्या संकटामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत . त्यामधील काही उपाय डोळसपणे न केल्यामुळे काही वेळा काही जणांना त्रास होताना दिसत आहे त्यासाठी हे काही मार्गदर्शन
 
1 रात्री अनेक जण हळदीचे दूध पिताना दिसत आहेत काहीजणांना त्यातील दुधामुळे त्रास होतो विशेष करून कफ प्रकृती असणाऱ्यांना सतत रात्री दूध प्यायल्याने त्रास होण्याचा संभव असतो अशांनी दूध टाळून त्या ऐवजी गरम पाणी आणि हळद असे मिश्रण घेतल्यास केव्हाही चांगले. 
 
2 सकाळी अनेक जण गरम पाणी लिंबू आणि मध यांचे सेवन करताना दिसतात खरे तर मध आणि गरम पाणी हे मिश्रण आरोग्यासाठी घातक आहे हे लक्षात घेतले पाहिजे तेव्हा मध घ्यायचा असेल तर तो साध्या पाण्यातच घ्यावा तसेच लिंबू आणि साधे पाणी हे मिश्रण देखील रोज सकाळी घेतल्याने काहीजणांना घशाला खवखव होऊ शकते अशांनी योग्य मार्गदर्शनाखालीच हे मिश्रण घ्यावे अशा इतरही काही गोष्टी आहेत पण त्या पुन्हा केव्हातरी बघू धन्यवाद