गणेशप्रिय आरोग्यदायी दुर्वा

    Date : 22-Aug-2020
|
आरोग्यदायी दूर्वा
 
 
ganapati bappa_1 &nb

लेखक:- वैद्य विजय कुलकर्णी

९८२२०७५०२१

दूर्वा हि छोटे खाणी वनस्पती श्री गणपतीच्या पूजेत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. दूर्वा या श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. त्या सर्वत्र सहजपणे उपलब्ध होता. श्री गणेश पूजनात या दुर्वांचा खूप पूर्वीपासून सातत्याने उपयोग केला जात आहे याचे कारण म्हणजे त्यामध्ये माणसाप्रमाणे अन्यय हि अनेक संजीवासाठी या दुर्वांमध्ये असणारे ओषधी गुण असावे. गणपतीच्या निमित्ताने सर्वच गणेश भक्तांनी दुर्वामधील हे ओषधी गुणधर्म समजून घेतले पाहिजे.

पित्तशामक,शीतल दूर्वा

दूर्वा या गुणाने अतिशय शीतल म्हणजे थंड असतात तसेच त्या चवीला गोड आणि गुणाने स्निग्ध असतात. आयुर्वेद शाश्त्राने फार प्राचीन काळी दुर्वांच्या ओषधी गुणाचे वर्णन केले आहे ते आजही सर्वाना उपयोगी ठरावे असे आहे. थंड गुणामुळे दूर्वा या शरीरातील वाढलेली उष्णता कमी करतात म्हणजेच त्या गुणाने पित्तशामक असतात. शरीरात पित्तामुळे निर्माण होणारे पित्ताचे अनेक विकार दुर्वांच्या सेवनाने कमी होतात.

१: दुर्वांचा रस कडून त्यामध्ये थोडी साखर घालावी आणि योग्य प्रमाणात त्याचे सेवन केले तर पोटातील जळजळ,लघवीची आग तसेच हातापायांची आणि डोळ्यांची आग कमी होते.

२: दुर्वांचा रस हा शरीरातून होण्याऱ्या रक्त स्तरावर खूप चांगला उपयोगी पडतो. उदा: नाकातून रक्त येणे, मुल्व्याधीतून रक्त जाणे, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी किंवा अन्य वेळी होणारा रक्त स्त्राव इ.

३: पोटातील आमाशय किंवा आतड्यात होणाऱ्या व्रणावर देखील दुर्वांचा रस उपयोगी आहे.

४: दुर्वाच्या रसाने सिद्ध केलेले दूर्वा घृत वरील अनेक पित्त विकारांचे शमन करते.

दुर्वांचा रस काढण्यापूर्वी त्या स्वच्छ पाण्याने दुवाव्यात आणि मग त्याचे बारीक तुकडे करून त्याचा रस काढावा तो गळून घेऊन मगच वापरावा. प्रत्येक वेळी ताजा रस प्यावा. रसाचे प्रमाण, घेण्याच्या वेळा आणि कालावधी हे वैद्यकीय सल्ल्याने ठरवावे.