बातमी आरोग्याची सेंटर फॉर बायोफार्मा एनालिसिस

    Date : 21-Sep-2020
|
बातमी आरोग्याची
पुणे येथे औषध निर्मितीच्या संशोधनासाठी सेंटर फॉर बायोफार्मा एनालिसिस ची स्थापना आतापर्यंत अंत औषधी निर्माण क्षेत्रात संशोधनाच्या पातळीवर औषधांच्या चाचणीसाठी आपल्याकडील औषधी उद्योगांना प्ररदेशावर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैसा यांची बरीच लूट देखील होत होती ती थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने पुणे येथे हे सेंटर फॉर बायोफार्मा एनालिसिस या केंद्राची स्थापना नुकतीच करण्यात आली असून या केंद्रांमध्ये औषधी निर्मितीच्या क्षेत्रात विविध चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे नवनवीन औषधे विकसित होणे कमी वेळात आणि कमी पैशात शक्य होणार आहे यापूर्वी नवीन औषधी संशोधनाच्या चाचण्यांसाठी प्ररदेशावर अवलंबून राहावे लागत होते आता आपण याही क्षेत्रात आत्मनिर्भर बनणार आहोत ही समाधानाची गोष्ट आहे.