अशी असावी आपली दिनचर्या

|

अशी असावी आपली दिनचर्या

v सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर काही न खाता पिता प्रथम मल-मूत्र विसर्जनास जावे.

v नंतर दंतधावन (दात घासणे) करावे. दात घासण्यासाठी शक्यतो वनस्पतीच्या चूर्णाचा उपयोग करावा. त्रिफळा चुर्णाने दात घासल्यास त्याचा उत्तम उपयोग होतो.

v रोज स्नान करावे. स्नानासाठी प्रकृतीनुसार कोमट किंवा गरम पाणी वापरावे. गरम पाण्याने रोज डोक्यावरून स्नान करू नये. स्नानापूर्वी सर्वांगाला तेलाने मालीश करावे, काही खाऊन लगेच स्नान करू नये.

v सकळी नियमित व्यायाम करावा. सूर्यनमस्कार हा एक उत्तम व्यायाम आहे. व्यायाम हा नेहमी रिकाम्या पोटी करावा.

v रोज सकाळी निरोगी व्यक्तींनी गाईचे दुध प्यावे. त्यामध्ये चवीपुरती साखर घालावी. अन्य कृत्रिम टॉनिक्सचा वापर दुधाबरोबर करू नये.

v शाळेत न्यावयाच्या डब्यामध्ये कोरडे अन्न नेऊ नये. स्निग्ध असे अन्न न्यावे.

v जेवण वेळच्या वेळी करावे,(शक्यतो दुपारी १२ ते १.३० यावेळेत व रात्री ८ ते ९ यावेळेत) जेवणात गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू अशा सहाही चवींचे पदार्थ असावेत.

v शिळे अन्न कधीही खाऊ नये. अन्न शिजवण्यासाठी अँल्युमिनीयम/हिंडालियमची भांडी वापरू नयेत. कारण ते आरोग्यास घातक ठरते.

v जेवण हे शांततेने, लक्षपूर्वक करावे.

v दोन खाण्यात किमान तीन तासाचे अंतर असावे.

v भूक लागल्यावर जेवावे.

v दिवसभरात तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे, जरुरीपेक्षा जास्त पाणी पिणे टाळावे.

v मल, मूत्र, अश्रू, शिंका इ. स्वाभाविक प्रवृत्तींना अडवू नयेत.

v संध्याकाळी रोज मैदानावर जाऊन खेळ खेळावेत.

v चहा, कॉफी यांचे सेवन शक्यतो टाळावे. टाळता न आल्यास त्यांचे प्रमाण दिवसाला एखादा कपच असावे.

v रात्री जागरण करू नये. नियमित वेळेला झोपावे. दुपारची झोप टाळावी.

v दूरदर्शन मर्यादित वेळच व योग्य अंतर व प्रकाश ठेऊन बघावा.

v अभ्यासासाठी जागरण न करता शक्यतो पहाटे अभ्यास करावा.

v आपली नखे व केस वाढू देऊ नयेत, त्वचेची नीट स्वच्छता राखावी, कानात मळ साचू देऊ नये.

v ऋतूनुसार आणि प्रकृतीनुसार आहार-विहारात योग्य तो बदल करावा.

वैद्य. विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक, नाशिक.

मो. ९८२२०७५०२१