प्रतिसाद वाचकांचा ऑक्टोबर अंकासाठी प्रतिक्रिया

    Date : 23-Oct-2020
|
 प्रतिसाद वाचकांचा 
 
 गोस्वामी_1  H x
 
 ऑक्टोबर अंकासाठी प्रतिक्रिया
आरोग्य चिंतन चा ऑक्टोबर अंक पूर्ण वाचून काढला. खूप माहितीप्रद आहे.कोविड १९ च्या अनुषंगाने आपल्या प्रकृती साठी रोज अर्धा तास व्यायाम फार महत्वाचा आहे. संपादकीय हेच सांगते. तसेच डॉक्टर चाकूरकर ह्यांचा कोविड तपासणी आणि गैरसमज हा लेख सर्व माहिती पूर्ण देतो. सामान्य माणसाला ह्याचा खूपच फायदा होतो. आपल्याला बर्याच गोष्टी नीट माहित नसतात. करोना लशी च्या माहितीसाठी दिलेले संकेतस्थळ vaccine.icmr.org.in चा सर्वांनी लाभ घ्यावा.
वेदना निवारण साठी आयुर्वेद हा लेख वाचल्यावर,आपण सर्व परत कधी crocin घेणार नाही. वैद्य कुलकर्णी ह्यांचा लेख मोठा आहे पण वाचनीय आहे.
तसेच हळदीचे आरोग्यदायी उपयोग आपणास प्रथमच हळदीची उपयुक्तता समजावतात.वैद्य नीलिमा राजगुरू ह्यांना खूप खूप धन्यवाद.
सध्याच्या धावणाऱ्या जगात वैफल्याने अनेक जण आत्महत्या करतात. ह्या विषयावर खूप छान माहिती व आपली जबाबदारी डॉक्टर दौंड ह्यांनी फार छान दिली आहे.
आरोग्य चिंतनचे आज पर्यंतचे सर्वच अंक फार सुरेख माहिती देतात. अंकाचे मुद्रण,मांडणी,विषय निवड आणि वाटप खूपच वाखाणण्याजोगे आहे. वैद्य विजय कुलकर्णी व अमृतकर ह्यांना आपले व्याप सांभाळून हे सर्व कसे जमते ह्याचेच आश्चर्य वाटते. ह्या पुढील अंक सुद्द्धा असेच संग्रही ठेवण्या सारखे असतील ह्याची खात्री आहे.
ह्या आरोग्य मार्गदर्शक मासिकाला खूप खूप शुभेच्छा.
यशवंत वाडेकर
९८६९ ४४ ८७३०
मुंबई