दुध पिता का?

    Date : 30-Oct-2020
|

 
 
 


kojagiri_1  H x
 
दुध पिता का?

लेखक :- विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

खर म्हणजे दूध हे पेय आपल्या रोजच्या आहार सवयीतला एक अविभाय अंग असायला हवे. पण आपण रोज दूध पिता का ? असा हल्ली विचाराव लागत. दूध हे आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. दूध पिण्याची सवय अगदी तान्ह्या बाळापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच असायल हवी. तान्ह्या बाळाला आईचे आणि मग मोठा होऊ लागले कि मग गाईचे दूध आयुष्यभर उपयोग पडते. सकाळी दुधाचा एक कप पचवण्याची क्षमता निर्माण करावी लागते. सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे दूध उपलब्ध आहे. अगदी कृत्रिम दुधापासून ते थेट धारोष्ण दुधापर्यंत पाच्छराईड असे पिशवीतले दूधही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यातील कृत्रिम दुधाची सवय अजिबातच नसावी. शक्यतो ताजे दुध पिण्यासाठी वापरलेले केव्हाही चांगले. दुध हे गाईचे आणि म्हशीचे असे प्रमुखत दोन प्रकारात उपलब्ध आहे. त्यामध्ये सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गाईचे दुध हिताचे. म्हशीचे दुध हे ज्यांना रात्री नीट झोप लागत नाही तसेच ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे. अशांनीच म्हशीच्या दुधाची सवय ठेवावी. म्हशीचे दुध हे गाईच्या दुधाच्या तुलनेने पचायला जड असते. गाईचे दुध हे शरीराच्या सर्व धातूंना बळ देणारे असते. जीव्नीय-रसायन असते. त्यामुळे व्याधी प्रतिकार क्षमताही उत्तम होते. ते बुद्धीलाही हितकारक असते. जेष्ठमधाचे चूर्ण आणि गाईचे दुध यांचे मिश्रण हे बुद्धिवर्धक असते. गाईच्या दुधाने शरीर बलवान होते. गाईचे दुध धारोष्ण मिळाल्यास उत्तम अन्यथा गरम करून प्यावे. त्यामध्ये थोडी साखर घालून घेता येते. दुधाबरोबर ब्रेड-बिस्कीट घेणे टाळलेले चांगले. शतावरी कल्पासारखे नैसर्गिक औषधत्यातून घेता येते. शिळे दुध पिण्याचे शक्यतो टाळावे. अतिथंड दुधाचीही नेहमी सवय असू नये. आम्लपित्ताचा त्रास असणारी अनेक मंडळी गार दुधाचा मारा करतात. तात्पुरते पोटात याने थंड वाटले तरीही अशी सवय लावणे चांगले नाही. हिताचेही नाही. थंड दुध हे अंतिमतः पचायला जड होते.

हिवाळ्यात दुध पिताना त्यात थोडीशी सुंठ घालून घेतल्यास ते बाधत नाही. कफाचा नेहमी त्रास होणाऱ्यांनी दुधाचे सेवन जरा जपूनच करणे चांगले. कारण दुध हे स्वभावतःच कफ निर्माण करणारे आहे.

दुध आणि भात खाताना त्यामध्ये मीठ घालून खाण्याची सवय प्रकृतीला घातक असते हे लक्षात ठेवावे. दुध-दही-भात खाणे हेही आरोग्याला चांगले नाही. दुध हे अनेक व्याधींमध्ये अमृताप्रमाणे उपयोगी पडते. उदराच्या रुगानांमध्ये दुग्धाहार देण्यात येतो. विविध औषधींनी सिद्ध अशा दुधाचा उपयोग आयुर्वेदीय चिकित्सेत केला जातो. या प्रकाराला क्षीरपाक कल्पना असे संबोधतात. अर्जुन क्षीरपाक, रासोन क्षीरपाक असे विविध प्रकार यात उपयोगात आणले जातात. दुध हे फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याचीही सवय शक्यतो टाळावी. काही व्यक्तीना विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जुलाब होतात. त्यांचा कोठा अतिशय हलका-मृदू असल्याचेही निदर्शक आहे. त्यामध्ये मीठ घालून खाण्याची सवय प्रकृतीला घातक असते. हे लक्षात ठेवावे. दुध-दही-भात खाणे हेही आरोग्याला चांगले नाही. दूध हे अनेक व्याधींमध्ये अमृताप्रमाणे उपयोगी पडते. उदराच्या रुग्णांमध्ये दुग्धाहारच देण्यात येतो. विविध औषधीनी सिद्ध अशा दुधाचा उपयोग आयुर्वेदीय चिकित्सेत केला जातो. या प्रकाराला क्षीरपाक कल्पना असे संबोधतात. अर्जुन क्षीरपाक, रसोन क्षीरपाक कल्पना असे विविध प्रकार यात उपयोगात आणले जातात. दूध हे फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याचीही सवय शक्यतो टाळावी. काही व्यक्तींना विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना दूध प्यायल्यावर लगेच जुलाब होतात. त्यांचा कोठा अतिशय हलका-मृदू असल्याचे हे निदर्शक आहे. अशानीही दुधाचा उपयोग थोडीशी सुंठ घालून सांभाळून करावा. दुधाची सवय असणे हे आरोग्याला नक्कीच उपयुक्त आहे. फक्त यासंदर्भात काही नियम मात्र पाळणे आवश्यक आहे.