शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय

    Date : 17-Jun-2020
|

body and mind_1 &nbs 
*शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय* 
१) आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपला आहार-विहार आणि आपली एकूणच दिनचर्या अत्यंत आरोग्यदायी असावी त्यासाठी काही वनस्पतीजन्य औषधांचा उपयोगही आपल्याला होऊ शकतो ( *उदाहरणार्थ* - चवनप्राश, गुळवेल, आवळा इत्यादी ) अर्थात हे *वैद्यकीय* मार्गदर्शनाखालीच घ्यावेत
 २) आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जेष्ठमध व गुळवेल, मंडूकपर्णी अशा औषधांचा योग्य मार्गदर्शनाखाली केलेला उपयोग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले किंवा प्रक्रिया केलेले अन्न मात्र स्मरणशक्तीला घातक असल्याने ते घेऊ नये.
३) आपल्या स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम आणि शरीराला तेलाचे मालिश करणे अतिशय उपयुक्त आहे. 
४) आपल्या मनाची शक्ती वाढवण्यासाठी योग हा अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी दररोज किमान १५ ते ३० मिनिटे योग करावा.
५) आपली पचनशक्ती उत्तम राहण्यासाठी आपण योग्य प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाणे आवश्यक असते. हींग, लसून, लिंबू हे पदार्थ आपली पचनशक्ती चांगली ठेवतात.
*वैद्य विजय कुलकर्णी*   
     आयुर्वेद चिकित्सा
            नाशिक 
संपादक : आरोग्य चिंतन मोबाईल 9822075021
--------------------------------
आधिक माहिती साठी 
arogyachintan  fesbook page
            व 
या वेबसाइटला भेट द्या.
(Pls forward this if you liked it)