हळदीचे औषधी उपयोग

|

हळद                          

haksa_1  H x W:

 

हळद ही आपल्यासर्वांच्या परिचयाची आहे. आपल्या रोजच्या आहारात तिचा समावेश होत्तो.पी हळद आणि हो गोरी ही म्हण तिच्यामध्ये त्वचेला गोरेपणा आणण्याचा महत्वाचा गुणधर्म सांगून जाते. खरोखर हळद हि निसर्गातील एक उत्तम औषध आहे. जगानेही तिचे महत्व ओळखून सुमारे २२ वर्षांपूर्वी जखम भरण्याच्या तिच्या गुणधर्माचे पेटंट घेतले होते.अर्थात हे पेटंट रद्द करण्यात भारताला यश मिळाले.आपल्या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये हळदीचे अनेक गुण वर्णन केले आहेत.

हळद हि गुणाने उष्ण आणि कोरडी आहे. ती पचायला हलकी आहे. कफ आणि वात या दोन दोषांचे शमन करते जखमेतून येणारे रक्त थांबवण्यासाठी तिचा उपयोग होतो. हळद चवीला कडू असते. बाहेरून त्वचेला लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो. लहान मुलांना आंघोळ घालताना हळद, डाळीचेपीठ आणि दुध यांचे मिश्रण लावतात.याने मुलांची त्वचा उजळते आणि मुलायम होते.चेहऱ्यावर मुरूम, फोड आल्यावर हळद चंदन इ.वनस्पतीचा मुखलेप लावतात. हळद ही रक्त शुद्ध करणारी असल्याने अनेक त्वचा रोगांवर तिचा उपयोग होतो.शरीरावर मार लागून सूज आल्यास हळदीचा लेप करतात. त्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पोटातून गुळ आणि हळद यांचे मिश्रण देतात.हळद ही मुत्राचे प्रमाण कमी करते. मधुमेहावर आवळा आणि हळद यांचे मिश्रण चांगले उपयोगी पडते.या मिश्रणाची गोळी करून रुग्णांना देतात. या गोळीला धात्रीनिशा गोळी असे म्हणतात. जखम भरून येण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. कावीळ झाल्यास हळद खाऊ नये असा समज अनेकांचा असतो.पण तो चुकीचा आहे.

जखमेतून येणारे रक्त त्वरित थांबावे यासाठी त्यावर हळद लावतात.आजीबाईच्या बटव्यात हळद हा एक प्रमुख घटक आहे. हळद ही कफशामक आहे.दूध घेतल्यावर कफाचा ज्यांना त्रास होतो. त्यांनी दुधात सुंठ आणि हळद घालून ते दुध प्यावे.दुधाचे प्रमाण कमी असावे.घसा दुखत असल्यास हळद गरम पाण्यात घालून गुळण्या कराव्यात.हळद ही कृमीनाशक आहे. त्यामुळे जखमेत किंवा शरीरात संसर्ग होऊ नये. यासाठी हळद वापरतात. दाढ किडली तर वेदना होतात त्या कमी करण्यासाठी दाढेत हळद भरतात याने कीड देखील कमी होते. त्यामध्ये काहीवेळा त्रिफळा आणि वावडिंग वापरतात.अशाप्रकारे हळद ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी औषधी आहे.