हिवाळ्यातील आहार

|

                 हिवाळ्यातील आहार

वैद्य. विजय कुलकर्णी.

आयुर्वेद चिकित्सक नाशिक.

मो. ९८२२०७५०२१

हिवाळ्यातील गुलाबी थंडी सुरुवात झाली कि, आपल्याला अधिक भूक लागल्याची जाणीव होते. भारतीय कालमानानुसार हिवाळा या मोसमाचे हेमंत आणि शिशिर असे दोन ऋतू होतात. यापैकी साधारणपणे संध्याचा कालमाननुसार १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी असा शिशिर ऋतू समजता येईल. हेमंत ऋतूमध्ये आपल्या शरीरातील अग्नी प्रबळ असतो. म्हणजेच आपली पचनशक्ती उत्तम असते. त्यामुळे आपपल्या या काळात भूकही चांगली लागते.

काय खावे? काय नको ?

· आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्येनुसार हिवाळ्यात पचायला जड तसेच स्निग्ध पदार्थ खावेत .

· या दिवसात गोड चवीच्या पदार्थ खावेत. अर्थात मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी गोड पदार्थ टाळावेत .

· गाईचे दुध, गाईचे तूप, तांदळाचा भात, वरण, गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी, केली, चिकू, डाळिंब, पपई, संत्री, मोसंबी, सीताफळ, विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या यांचा समावेश आपल्या आहारात असावा .

· ज्यांना कफाचा त्रास होत नाही, त्यांनी या काळात दही-साखर असे मिसळण दिवसा घेण्यास हरकत नाही .

· या काळात श्रीखंड, गुलाबजाम, खव्याची खीर, शेवयाची खीर, गव्हाची खीर, अशी विविध प्रकारची पक्वाने आपण सहज पचवू शकतो. या काळात दुध पिताना त्यामध्ये थोडी सुंठ टाकून ख्यावीत .

· चहा पिण्याची सवय असल्यास त्यामध्ये थोडे आले टाकावेत.गवती चहा सेवन या काळात उपयुक्त ठरते .

· या दिवसात पाणी पिताना ते थोडे कोमट करून प्यावे. माठ किवा फ्रीजमधील पाणी पिणे टाळावेत.

· कृत्रिम शीतपेय, आईस्क्रीम यांचे सेवन टाळावे. कारण, हिवाळ्यात बाहेर थंड वातावरण असल्याने अशा थंड पदार्थच्या सेवनाने कफ आणि वात यांचे विकार होण्याची शक्यता असते.

· या काळात नेहमी गरम आणि ताजे अन्न घ्यावे. शिळे, थंड अन्न खाऊ नये. गुल पापडी, रवा, बेसन आणि साखर, डिंक, शेंगदाणे, गूळ यांचे लाडू तसेच बदाम, काजू, काळ्या मनुका असा सुकामेवा यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

· या काळात साखरेचा उपयोग करून तयार केलेले काही पदार्थ आरोग्यदायी ठरतात उदा: गाजराचा हलवा, दुधीभोपलाच्या हलवा. आवळ्याचा मोर आवळा. संक्रांत हा सणही याच काळात येता. त्या निमित्ताने तिळगुळाची वडी तसेच गुळाची पोळी, पुरणपोळी हे पदार्थ आरोग्यदायी आहेत.

· हिवाळ्यामध्ये कफाचा आणि वाताचा विकास होण्याची शक्यता असल्याने वात आणि कफ वाढणारा आहार कदापीही घेऊ नये. ज्यांना मांसाहार पचविण्याची शक्ती असते, जे भरपूर व्यायाम करतात अशांनी या दिवसात पचण्यास जड असलेला मांसाहार करण्यास हरकत नाही.

· लहान मुलांना सुंठ व मध हे मिश्रण योग्य प्रमाणात दिल्यास कफाचा त्रास टाळता येतो.

गुणकारी आवळा: ‘आवळा हे फळ या ऋतूत उपलब्ध असते. ते आपल्या आरोग्याला अतिशय उपकारक असल्याने आवळा आणि अन्य चाळीस पदार्थपासून बनलेला च्यवनप्राश हिवाळ्यात खाने अत्यंत आरोग्यदायी आहे. रोज सकाळी पोट साफ झाल्यावर प्रकृतीप्रमाणे योग्य प्रमाणात च्यवनप्राश घेवून थोड्या वेळाने गाईचे दुध प्यायल्यास शरीर पुष्ट होते आणि आपली प्रतिकारशक्ती, बुद्धी, स्मृती अतिशय उत्तम रहाते.

-वैद्य विजय कुलकर्णी