2 1 सप्टेंबर जागतिक स्मृतिभ्रंश दिना निमित्त....

    Date : 20-Sep-2021
|
                                 2 1 सप्टेंबर जागतिक स्मृतिभ्रंश दिना निमित्त....
 
                             स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही विशेष उपाय योजना
           वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सा नाशिक संपादक आरोग्य चिंतन 98 220
1. सर्वप्रथम आपण जर आपले रोजचे अन्न ॲल्युमिनियम च्या भांड्यात शिजवत असाल तर ती ॲल्युमिनियमची भांडी बाजूला ठेवावी. आणि स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात किंवा पितळ्याच्या उत्तम कलही केलेल्या पातेल्यात अन्न शिजवावे कारण ॲल्युमिनियम च्या भांड्यात शिजविलेले अन्न सातत्याने सेवन केल्यास आपल्या स्मरणशक्तीला ते घातक ठरू शकते.
2. स्मरणशक्ती तसेच बुद्धी नीट वाढण्यासाठी आपण रोज रात्री पुरेशी झोप घ्यावी रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे रात्री जागरण केल्यास त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होऊन पर्यायाने स्मृतीवर देखील परिणाम होऊ शकतो .
3. देशी गाईच्या दुधापासून संस्कारित केलेले शुद्ध तूप हेदेखील बुद्धीला आणि स्मरणशक्तीला हितकारक आहे. ते महाग असले तरीसुद्धा ते आपल्या आरोग्याला हिताचे असल्याने त्याचे सेवन नित्य करावे .
4 .सुवर्णसिद्ध जल याचाही उपयोग बुद्धीच्या हितासाठी होऊ शकतो हे सिद्ध जलद वैद्यकीय सल्ल्याने योग्य मार्ग मार्गदर्शनाखाली तयार करून घ्यावे .
5. ब्राह्मी वेखंड जेष्ठमध अशा अनेक वनस्पती या बुद्धीला हितकारक म्हणून आयुर्वेदशास्त्राने सांगितलेल्या यांच्या विविध औषधी योजना वैद्यांच्या सल्ल्याने सेवन कराव्यात (या व अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आरोग्य सल्ला यासाठी आरोग्य चिंतन हे मासिक अवश्य वाचा वार्षिक वर्गणी रुपये दोनशे पन्नास फक्त फोन पे किंवा गुगल पे करा 98 220 75 0 21 संपादक वैद्य विजय कुलकर्णी
कार्यकारी संपादक श्री रवींद्र अमृतकर आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या .www.arogyachintan.in )