कसा असावा ‘मधुमेही’ चा दिनक्रम

|

कसा असावामधुमेहीचा दिनक्रम

लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

       ‘मधुमेहअसणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होण्याएवजी वाढत चाललं आहे. आजच्यासारख्या लोकांचा अनिर्बंध दिनक्रम असाच पुढे राहिला तर या पुढे याबाबतीत बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. तथापि, आजच्या मधुमेहीच्या संधार्भात त्यांचा असणारा अपेक्षित दिनक्रम या ठिकाणी चर्चेत आला तर ते मधुमेही व्यक्तीप्रमाणेच मधुमेहाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मंडळीनाही ते उपयुक्त ठरेल. मुळात सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होण केवळ मधुमेहीच्याच नव्हे तर सगळ्यांच्या बाबतीत अपेक्षित असतं मधुमेहीमध्ये तर ते अत्यावश्यकच असत. कारण मुळातच रक्तातली साखर वाढल्याने जडत्व निरुत्साह या गोष्टीना तोंड देता देता, पोट साफ न झाल्यास ती तक्रार आणखी वाढून त्रास अधिकच वाटतो. मलावरोधाचा त्रास मधुमेही व्यक्तीना असला तर त्रिफळा चुर्णाचे सौम्य विरेचन त्यांना उपयोगी पडते. ते रात्री झोपण्यापूर्वी एक तास प्रकृतीनुसार योग्य प्रमाणात कोमट पाण्यातून घेता येते.

मधुमेह असणाऱ्या लोकांनी सकाळी उठल्याउठल्या पाणी पिण टाळायला हवं. पुष्कळदा पाण्याच्या बाबतीत एक मोठा गैरसमज आढळतो कि पाणीभरपूर प्यायला हवे. सकाळी उठल्यावर तहान लागली तरच एक दोन घोट पाणी प्यावं, शरीरात क्लेद चिकटपणा वाढला तर मधुमेह वाढण्याची शक्यता असते हा आयुर्वेदाचा सिद्धात आहे. उषःपानामुळे हा क्लेद वाढण्याचीच शक्यता अधिक असते हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. हे लक्षात घ्यायला हवं.

सकाळी फिरण आवश्यकच

मधुमेह झालेल्या व्यक्तीना सकाळी फिरण हे गरजेच आहे. किती फिरावं हे मात्र प्रत्येकाच्या प्रकृतीनुरूप ठरवायला लागत. तीन-चार-पाच किलोमीटर एवढ अंतर फिरायचं अस मोजून सांगता येणे कठीण आहे. याचं कारण एखाद्या व्यक्तीला दोन किलोमीटर अंतर चालले तरी पाय दुखायला लागतात. पाय दुखण हि मधुमेहीची बरीच मोठी तक्रार आढळते. विशेषतः पायाचे स्नायू दुखतात, त्यासाठी रोज पायांना तेल लावणंही खूप उपयोगाचं ठरत. अंघोळीच्यावेळी सगळ्याच अंगाला तेल लावलं तर चरबीही फार वाढत नाही. मधुमेहींना तर अभ्यगांचा चांगला उपयोग होतो. या व्यक्तीना चालण्याबरोबर काही व्यायाम करणे आवश्यक असतं. यामुळे रक्तातल्या साखरेवर योग्य नियंत्रण ठेवता येतं.

मधुमेहींनी पहाटे लवकर उठण हेही खूप आवश्यक असत. कारण त्यांनी वाजवीपेक्षा अधिक घेतलेली झोप त्यांना त्रास देऊ शकते. दुपारीही जेवणानंतरची झोप या मंडळींनी टाळायलाच हवी. दुपारच्या झोपेनंतरही निरुत्साह, जडपणा, आळस, वजन वाढतं.

जेवढी कष्टाची काम पेलवतील तेवढी करण हे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने हिताच ठरत. यानही रक्तातल्या साखरेवर नियंत्रण ठेवता येत. खूप आराम करण, बैठ काम सतत करावं लागण या गोष्टी मधुमेह वाढवणाऱ्या ठरतात. हे पक्क लक्षात घ्यायला हव.

मधुमेहाचा आहार

मधुमेही लोकांच्या दिनक्रमात त्यांच्या आहाराला खुपच महत्व आहे. त्यांच्या खाण्यात सगळच बिनसाखरेचाअसावंच पण बिनगुळाचंही ते असणं आवश्यक आहे. म्हणचे अगदी वरणातही थोड्यासुद्धा गूळ नको, चहा, कॉफी, दुध घेताना ते बिनसाखरेचे हवेत. दुधाच्या प्रकारांपैकी या लोकांनी गाईचे दुध घेतलेले केव्हाही चांगले. तेही साय काढून मगच वापरावं. शक्यतो दुध गरम गरम घ्याव. तसच अतिथंड दुध टाळायला हव. दहीदेखील टाळाव. साजूक तूप (गाईच) खायला हरकत नाही. या मंडळींनी फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ टाळावेत. शीतपेय, आईस्क्रीम याचं सेवन करू नये, शिळ खाऊ नये, हवाबंद डब्यात साठवलेले पदार्थ खाऊ नयेत, ताज गरम गरम अन्न घ्यावं.

मधुमेही व्यक्तींनी भाजलेली धान्य घ्यावीत म्हणजे आपल्या खाण्यात धान्ये भाजून वापरावीत. तांदूळ, गहू, ज्वारी भाजून घ्यावे ते धान्य पचायला हलके होते.पचायला जड असणारा आहार या मंडळींनी टाळायलाच हवा. नवीन धान्य ही शरीरात चिकटपणा (क्लेद) वाढवतात. म्हणून मधुमेही व्यक्तींनी ती खाऊ नयेत. ज्यांच्या घरी मधुमेह आहे अशा कुटुंबातील व्यक्तींनी तर याबाबत विशेष दक्षता घ्यायला हवी. कारण अनेकदा यामध्ये आनुवंशिकता आढळते. मधुमेही व्यक्तीना आवळा आणि हळद याचं मिश्रणही उत्तम लागू पडत. रात्रीच्या जेवणानंतर हे मिश्रण घेतलं तर त्याचा उपयोग होतो. रात्री लघवीला उठायला लागण ही यांची मोठी तक्रार असते. त्यासाठी रात्रीची झोप आणि रात्रीचे जेवण यात किमान दीड ते दोन तासांच अंतर असायला पाहिजे. जलचर प्राण्यांचं मांसही टाळण मधुमेहीच्या हिताच असत. उसाचा रस किंवा उसाचे पदार्थही पूर्णपणे टाळण म्हत्वाच आहे.

मधुमेही व्यक्तीना आपली साखर नियंत्रणात ठेवावी लागते. ती ठेवली नाही तर शरीरातील अवयवांवर त्यांचे विपरीत परिणाम होतात. डोळा, किडनी,मेंदू, हृदय, यावर त्यांचे परिणाम दिसतात. यासाठी मधुमेही व्यक्तींनी काही प्रमाणात रसायन चिकित्सा घेण फायदेशीर असते. आवळा, हिरडा, बेहडा या तीन फळांचे जे मिश्रण त्रिफळायांचाही चांगला उपयोग मधुमेहींसाठी होतो. सुपारी, खैर, यांचा काढाहीउपयोगी पडतो, अशी अनेक औषधे मधुमेहात वैद्यकीय सल्ल्याने वापरता येतात.

मनावर नियंत्रण हे मधुमेही व्यक्तींमध्ये अत्यंत आवश्यक असते. मानसिक चिंता असण. मनावर ताण असण याने मधुमेहावर विपरीत परिणाम होतो. या मंडळीना आपले वजनही आटोक्यात ठेवावे लागते ते वाढू देता कामा नये आणि आवश्यकतेपेक्षा कमी होऊ देता कामा नये. मधुमेही व्यक्तींनी याप्रकारे आपला विहार ठेवायला हवा.