आरोग्यासाठी उपवास करताना

|

  महाशिवरात्रीच्या निमित्ताने

                                                                     आरोग्यासाठी उपवास करताना

                                                                                                                                                             लेखक वैद्य विजय कुलकर्णी                                                                                                                                                                                आयुर्वेद चिकित्सक                                                                                                                                                                                  संपादक आरोग्य चिंतन

                                                                                                                                                    9822075021FARAL

                उपवास करणाऱ्या मंडळींची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अपेक्षित दिनक्रमात बद्दल विचार करणे आवश्यक बनले आहे. मुळात उपवास कशासाठी करायचे जीवनशैलीतील या घटकाचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करायचा आहे मग त्याला पूरक ठरेल असाच उपवास करायला हवा .म्हणजे ज्यांच्या आरोग्याला सोसवेल आणि आवश्यक असेल अशांनी उपवास करणे चांगले आणि त्यांचा त्याचा कालावधी महिन्यातून जास्तीत जास्त एक वेळ असाच असावा. आठवड्यातून दोन दोन दिवस उपवास करायला लागले तर ते आरोग्याला घातक असते त्यात संशय बाळगण्याचे कारण नाही आणि असा उपवास कोणाला सोसवेल ??तर त ज्याचे शरीर बळकट आहे जास्तच जाड आहे. त्यांना जे कमी वजनाचे आहेत, दुर्बल आहेत ,मधुमेही आहेत ,लहान आहेत ,खूप वृद्ध आहेत अशांना उपवास करणे हिताचे नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.ज्यांना पित्ताचा त्रास होतो भूक सहन होत नाही. अशांनी उपवास करू नये हे ओघानेच आले पण हे लक्षात न घेता उपवास करण्याची प्रथा आहे. ज्यांना सांधेदुखी सारख्या वातव्याधी झालेला असेल त्यांनाही उपवास त्रासदायक ठरतो मुळात अति उपवासाने वात आणि पित्त हे दोन शरीर दोष वाढतात. त्यामुळे या दोन दोषांचे विकार ज्यांच्या शरीरात आहेत अशांनी उपवास टाळणे चांगले. उपवास करणे हे आरोग्यदायी होण्यासाठी तो करणाऱ्या व्यक्तींनी त्या दिवशीचा आपला दिनक्रम हा योग्य ठेवणे आवश्यक आहे. उपवासाच्या दिवशी लंघन करावे म्हणजे नेमके काय करावे असा प्रश्न अनेक जण विचारतात. लंघन दोन प्रकार होतात एक म्हणजे पूर्ण लंघन आणि दुसरे म्हणजे हलके अन्न घेणे यातील पहिला प्रकार आहे तो खूप कमी जणांना सहन होतो सर्वांच्या दृष्टीने हिताचा दुसरा लंघन प्रकार आहे म्हणजे असा उपवास त्या दिवशी लघु म्हणजे पचायला हलके असलेले अन्न घ्यावे त्यात सध्या उपवास करणाऱ्या मंडळींचा आहार जर आपण बघितला तर असे दिसते की बटाटे रताळी साबुदाणा भगर शेंगदाणे इत्यादी पदार्थांची रेलचेल उपवासाच्या दिवशी असते. त्यात फलाहार करण्याची भारी हौस म्हणून पचायला जड असलेले केळ उपवासाला चालते आणि म्हणे पचायला हलकी भाताची पेज मुगाची खिचडी हे अजिबात चालत नाही या बाबतीत खरेच मुळापासून विचार करण्याची आवश्यकता आहे कारण हल्ली सगळ्याच उपवास करणाऱ्यांचे एकादशी आणि दुप्पट खाशी असे चालले आहे उपवास हा पचनशक्तीला विश्रांती देणारा असायला हवा याउलट सध्याचा उपवास हा पचनशक्ती वरील अधिक ताण वाढवणारा असाच प्रचलित दिसतो त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या दिवशी पचायला हलके असे अन्न घ्यायला आरोग्याच्या दृष्टीने कोणीही हरकत घेणार नाही उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाल्ला पाहिजे असे कोणत्या विशिष्ट ग्रंथ लिहिलेले अजून तरी आढळले नाही तेव्हा सगळ्यांनी याचा सारासार विचार करून निर्णय घ्यायला हवा या दिवशी साबुदाणा शेंगदाणे बटाटे रताळी सगळे पचायला जड आहेत उपवास असलेल्या दिवशी त्या व्यक्तींनी खूप श्रमाची कामे टाळावीत अति चहा पिणे टाळावे व्यायाम हलका करावा राजगिऱ्याचे लाडू हा पचायला हलका असल्याने उपवासाच्या दिवशी चांगला. या गोष्टी उपवासाच्या दिवशी पाळल्या तर आरोग्याला असा उपवास हा नक्कीच लाभदायक ठरू शकेल राजगिर्‍याचा लाडू प्रमाणेच राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले काही पदार्थ देखील उपवासाला उपयोगी पडू शकतात ते ही पचायला हलकी असतात. त्याचप्रमाणे पपई डाळिंब अशा प्रकारची पचायला हलकी असणारी फळे उपवासाला चांगली उपयुक्त ठरतात ज्यांना कफाचा त्रास होत नाही त्यांनी गायीचे दूध उपवासाच्या दिवशी अवश्य घ्यावे कोमट पाणी हे देखील पचायला हलकी असते त्यामुळे उपवासाला कोमट पाणी खूपच चांगले ठरते अशाप्रकारे आरोग्यदायी उपवास आपण व्यवस्थितपणे आणि डोळसपणे केला पाहिजे.