उन्हाळ्यातील आरोग्यदायी नैसर्गिक शीतपेये

|

उन्हाळ्यातील आरोग्यदायी नैसर्गिक शीतपेये

वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

उन्हाळा सुरु होताच वातावरणात होणारा बदल शरीराला व मनाला जाणवू लागतो. उन्हाळा सुरु झाल्यावर या वातावरण बदलाचा शरीरावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

हवेत उकाडा सुरु झाल्यावर आपल्याला तहान वाढल्याची जाणीव व्यायला लागते. ही तृष्णेची जाणीव होणे हा या ऋतूचा आपल्या शरीरावर होणारा महत्वाचा परिणाम होय. हिवाळ्याच्या तुलनेने उन्हाळ्यात तहान जास्त लागते. कारण उन्हाळ्यात आपल्या शरीराची स्वाभाविकतच तृष्णा वाढलेली असते. ही तहान अनेक जन विविध पद्धतीनी भागवायचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांमध्ये नकळत त्यांच्याकडून काही चुका होतात आणि त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

कृत्रिम शीतपेयांचे वेड :

आधुनिक काळात कृत्रिम शीतपेयांचे वेड वाढत चालले आहे. तहान लागल्यावर शीतपेये पिऊन आपली तहान भागवणे अशी एक फाशन होऊन बसली आहे. नेहमी नेहमी कृत्रिम पद्धतीने बनवलेल्या शीतपेयांचा वापर करणे ही आपल्या शरीराला हितकारक नाही. अनेकविध नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण आपली तृष्णा या काळात शमवू शकतो. अये नैसर्गिक पदार्थ आपण माहिती करून घेणे गरजेचे.

फ्रीजमधील गार पाणीही नेहमी पिण्यात ठेवल्यानए त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे जुनाट सर्दी, खोकला डोके जड पडणे असे विकार होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधील पाणी सतत, दररोज पिण्याचे टाळावे. यापेक्षा मातीपासून तयार केलेल्या माथामध्ये गार झालेल पाणी या काळात पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक उपकारक आहे. माथामध्ये मोग्र्यासारखी सुवासिक फुले टाकून मग त्यातील पाणी प्यायल्याने मनाला व शरीराला अधिकच प्रसन्नता येते.

उसाचा रस हितकार :

उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचा वापर करूनच इतर अनेक प्रकारे पेये करता येतात.

मनुका तसेच खजूर हे पदार्थ पाण्यात पाण्यात मिसळून मग ते पाणी गाळून पिण्यास घेतले तर शरीराला या काळात येणारा थकवा दूर होण्यास मदत होते. या काळात शरीराचा थकवा व ग्ल्यांनी दूर करणारे दुसरे शीतपेय म्हणून त्यापासून काढलेला रस उसाच्या रसाने शरीराचे तर्पण होते. हा उसाचा रस पौष्टिक, स्निग्ध शीत गुणधर्माचा व मधुर रसाचा असतो असे वर्णन आयुर्वेद शास्त्राने केलेले आहे. याची प्रत्यक्ष प्रचीती आपल्याला त्याच्या सेवनाने येते.

कोकम च्या फळापासून बनवलेले सरबत या दिवसामध्ये शरीराला खूप उपयुक्त ठरते. कोकणात होणाऱ्या या फळास या काळात देशावर खूप मागणी असते. त्याच्या सरबतामध्ये जिरे, धने टाकून पाचान्संस्थेच्या दृष्टीने ते अधिक हितकारक करता येते. या काळात आपली पचनसंस्था मंदगतीने काम करत असते. कोकमाच्या सरबतामुळे पचनसंस्था प्राकृत राहण्यास मदत होते.

नारळाचे पाणी, लिंबापासून बनविलेल्या सरबताचाही तहान भागवण्यासाठी उपयोग होतो. लिंबू हे फळ मुळातच पाचक आहे. त्यामध्ये क जीवन सत्वाचे प्रमाण पुष्कळ असते.

उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम खूप येतो त्यामुळे शरीराला एक प्रकारची ग्लानी येते. नारळाचे पाणी हा यावर उत्तम उपाय आहे. नारळाच्या पाण्याने शरीराला खूप प्रसन्न वाटते. शरीरातील पाण्याची होणारी झीज याच्या सेवनाने भरून निघते. म्हणून नारळाच्या पाण्याचा उपयोग या ऋतूत मधूनमधून करीत जावा.

उन्हाळ्यामध्ये नेहमीच्या वापरात असावा असा एक पेयपदार्थ म्हणजे कैरीपासून केलेले सरबत (ज्याला पन्हे असे म्हटले जाते) या कैरीच्या सर्बातामुळे आपली तहान योग्य प्रकारे भागवली जाते शरीरास येणारा थकवाही दूर होतो.

धने व खडीसाखर रात्रभर थंड पाण्यात भिजवून ठेवून मग ते पाणी सकाळी गाळून पिऊन टाकावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. संत्र्यापासून काढलेला रसही या काळात उपयुक्त ठरतो.

उन्हाळ्याची तीव्रता वाढायला लागली कि, त्या काळात गार दूध व साखर हे मिश्रण उपयोगी ठरते. तसेच गार ताक या काळात प्यावे. त्यामुळेही फायदा होतो.

वरील सर्व विवेचनावरून एक गोष्ट ध्यानात येईल कि, निसर्गाने या काळात आपली तहान भागवण्यासाठी आपल्या शरीराला येणारा थकवा घालवण्यासाठी आपल्या मनाला येणारी मरगळ दूर करण्यासाठी अनेक पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचा वापर करण्याची प्रवृत्ती कमी होऊन कृत्रिम पदार्थांच्या वापराकडे हल्ली अनेकांचा कल दिसतो आहे. वर सांगितलेल्या नैसर्गिक पदार्थांचा आपल्या शरीराला होणारा उपयोग लक्षात घेऊन उन्हाळ्यात त्यांचा योग्य त्या प्रमाणात वापर करून आपले आरोग्य चांगले राहील असा विश्वास वाटतो.

चहाचा अतिरेक नको :

थंड पेयांचा आस्वाद घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे असते. उन्हामध्ये बाहेर फिरून आल्यावर ताबडतोड थंड पेयाचा आस्वाद घेऊन नये. बाहेरून आल्यावर ५/१० मिनिटे थांबून मगच थंड पेयांचा आस्वाद घ्यावा. अन्यथा शरीराला ते अपायकारक ठरण्याची शक्यता असते.

तसेच या काळात चहा, मद्य, यांचे सेवन करणे टाळावे या सर्व गोष्टी पाळून आपले आरोग्य या काळात चांगले राखावे.