चिरतारुण्याचे रहस्य भाग -१

17 Jan 2026 13:56:52
डॉ. प्रकाश जाधव
आयुर्वेदाचार्य, ता. खानापुर, जि. सांगली
 
बालपण, तारुण्य व वृध्दावस्था हे निसर्गनियमाला धरून असले तरी वृध्दावस्था टाळण्यासाठी जगभर शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. मात्र वृध्दास तरुण करण्याचा प्रयोग अजून तरी यशस्वी झालेला नाही. आपणांस वृध्दावस्था येऊ नये, असे प्रत्येकास वाटते. तरुण दिसण्यासाठी मनुष्य अखंड धडपड करतो. काही जण 'मेकअप' करून सौदर्यप्रसाधने वापरून वरवरचे तारूण्य जोपासताना दिसतात. आता कुणी 'केशकलप' केला नाही तर, ८०% तरुणांचे केस पांढरे असलेले आढळतील. हे अकाली (केश) वृध्दत्व झपाट्याने वाढत आहे. पुढारलेल्या अमेरिकेतही वृध्दत्व टाळून तारुण्य देणा-या औषधांची भरमार होत असून त्यांची अफाट विक्री होत आहे. हे भयावह चित्र मानवी जीवनाची अधोगती दर्शविते... तर चिरतारुण्याचे नेमके रहस्य कुठे दडलेले आहे? वृध्दावस्थेवर कशी मात करता येईल ? यावर पूर्वसूरींचे प्रयोग व आधुनिक विज्ञान दृष्टीकोनातून घेतलेला वेध यातून काही गवसते. ते आत्मसात करणे चिरतारुण्यासाठी चिरकालीन फायद्याचे आहे.
 
वृध्दास तरूण बनविण्याचे प्राचीनांचे प्रयोग
ऋग्वेद हा जगातील पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन व प्रथम ग्रंथ समजला जातो. त्यात पांच विविध ऋर्षीनी च्यवानाच्या पुनः यौवनाची माहिती दिलेली आहे. ती अश्विनींनी नवतारुण्य दिले, व त्वचारोगही बरा करून तिला पती मिळवून दिला. असा उल्लेख पुढील ठिकाणी ऋग्वेदात आला आहे. (१।११७/७). येते. युवं नरा सतुवते कष्णियाय विष्णाप्वं ददथुर्विश्वकाय । घोषायै चित्त पित्र्यदे दुरोने पतिं सूर्यन्त्या अश्विनावदतम् ।। ... अमाजुरश्विद भवथो युवं भगो अनाशोश्विदवितारापमस्य चित्त । अन्धस्य चिन नासत्या कर्शस्य चिव युवामिदाहुर्भिषजा रूतस्य चित्त ।।. १०-३९-३. तर १०-३९-८ मध्ये कलि नामक वृध्द ब्राह्मणाला अश्विनींनी पुन्हा तरूण बनविले, असे युवं विप्रस्य जरणामुपेयुषः पुनः कलेरक्रणुतंयुवद वयः । तेव्हा सर्वत्र समभावाने बघून साधेपणाने वागून अश्विनींनी कीर्ति मिळविली आहे. वांझ गाईपासून दूध मिळविणे, युध्दातील पंगू लोकांना चालते करणे, अंध लोकांना दृष्टी देणे, श्रवण शक्तिचे प्रयोग इ. वैद्यकांतील प्रयोग केले आहेत. अश्विनींनी क्र. १।११७।२४ मध्ये 'ह शयावमश्विना विकस्तमुज्जीवस..' श्यावास दीर्घायुष्य दिले. ४ । १५ ।९ मध्ये साहदेव्य सोमक यास दीर्घायु केले; असे आढळते. तसेच ऋग्वेदात अश्विनींशिवाय 'इंद्र' व 'ऋभु' हे देखील प्रसिध्द आहेत. ऋभु, वाज आणि विभु हे तिघेही बंधु सुधन्वन् आंगिरसाचे पुत्र होते. देवांचा स्थापत्यविशारद 'त्वष्टा' यांचे ते तीनही बंधु शिष्य होते. त्यांनी बरेचसे वैज्ञानिक प्रयोग करून चमत्कार घडविले. ऋग्वेदात ऋभूची स्तुती सात विविध ऋषींनी केलेली आढळते. त्यात त्यांनी दोन अश्व निर्माण केले. उत्तम रथ बनवून अश्विनींनी दिला. खूप दूध उत्पादन करणारी गाय निर्माण केली. त्यांनी अलौकिक बुध्दिने आपल्या वृध्द मातापित्यांना पुन्हा तरूण बनविले. त्वष्टाने जो 'चमस' (सजीव पेशी) निर्माण केला, त्याचे त्यांनी चार चमस बनविले. (क्र. १२०). तसेच ऋग्वेदात ११०, ११, क्र. १/११६, ५/७४,७५, ७/६८, १०/३९ येथे आली आहे.
 
जुजुरूषो नासत्योत वत्रिं परामुञ्चतं दरापिमिवं चयवानात ।
परातिरतं जहितस्यायुर्दस्रादित पतिमक्रणुतं कनीनाम।।
ऋग्वेद १ । ११६ । १०. 
 
वृध्द च्यवान ऋषीला अश्विनींनी पुनःश्च तारूण्य मिळवून देऊन त्याचे आयुष्य वाढवून दिले. त्याचे लग्न एका तरुणीशी लावून दिले. सापाने जशी कात टाकावी, तसेच च्यवानाचे वार्ध्यक्य जीर्ण कवचाप्रमाणे काढून टाकले. येथे नवीन त्वचा उगवली आली असे वाटते. आधुनिक विज्ञानाला असा प्रयोग अजून तरी जमलेला नाही.
 
युवं चयवानमश्विना जरन्तं पुरर्युवानं चक्रथुः शचीभिः
युवो रथं दुहिता सूर्यस्य सह शरिया नासत्याव्रणीत।।
ऋग्वेद १।११७ ।१३
 
च्यवानास एकाच तरूणीशी लग्न नव्हे तर अनेक कन्यांचा पति बनविले. 'आत् इत् कनीनां पर्ति अकृणुत।' येथे अनेकवचनी शब्द आहे. निदान २-३ कन्यांचा पति झाला असला पाहिजे. म्हणजे तेवढे तारूण्य त्यास प्राप्त झाले असावे.
 
पर चयवानाज जुजुरूषो वव्रिम अत्कं न मुञ्चथः
युवा यदी कर्थः पुनर आ कामम रण्वे वध्वः।।
क्र. ५/७४/५.
 
येथे 'वध्वः कामं आवृण्वे. म्हणजे वधुंची कामना - इच्छा पूर्ण होण्याइतके बल च्यवनास दिलेत. असे सांगितले आहे. म्हणजे ते कार्यक्षम तारूण्य होते, हे निश्चित होय. क्र. ५/७५/५ मध्ये म्हटले आहे.
 
बोधिन्मनसा रश्येषिरा हवनश्रुता
विभिश चयवानम अश्विना नि याथो अद्वयाविनम् माध्वी ममशरुतं हवम ।।
 
तर पित्याकडे राहणा-या घोषा नामक जरठकुमारीला  अश्विनींनी नवतारुण्य दिले, व त्वचारोगही बरा करून तिला पती मिळवून दिला, असा उल्लेख पुढील ठिकाणी ऋग्वेदात आला आहे. (१।११७/७). येते.
 
युवं नरा सतुवते कष्णियाय विष्णाप्वं ददधुर्विश्वकाय । घोषायै चित्त पित्र्यदे दुरोने पति सूर्यन्त्या अश्विनावदतम् ।। ... अमाजुरश्चिद भवथो युवं भगो अनाशोचि‌द्वितारापमस्य चित्त । अन्धस्य चिन नासत्या कर्शस्य चिव युवामिदाहर्भिषजा रूतस्य चित्त ।।. १०-३९-३ तर १०-३९-८ मध्ये कलि नामक वृध्द ब्राह्मणाला अश्विनींनी पुन्हा तरूण बनविले, असे युवं विप्रस्य जरणामुपेयुषः पुनः कलेरक्रणुतंयुबाद वयः । तेव्हा सर्वत्र समभावाने बघून साधेपणाने वागून अखिनींनी कीर्ति मिळविली आहे. वांझ गाईपासून दूध मिळविणे, बुध्दातील पंगू लोकांना चालते करणे, अंध लोकांना दृष्टी देणे, श्रवण शक्तिचे प्रयोग इ. वैद्यकांतील प्रयोग केले आहेत. अधिनींनी क्र. १।११७/२४ मध्ये 'ह शयावमश्चिना विकस्तमुञ्जीवस..' श्यावास दीर्घायुष्य दिले. ४।१५।९ मध्ये साहदेव्य सोमक यास दीर्घायु केले; असे आढळते. तसेच करवेदात अश्विनीशिवाय 'इंद्र' व 'ऋभु' हे देखील प्रसिध्द आहेत. ऋभु, वाज आणि विभु हे तिघेही बंधु सुधन्वन् आंगिरसाचे पुत्र होते. देवांचा स्थापत्यविशारद 'त्वष्टा' यांचे ते तीनही बंधु शिष्य होते. त्यांनी बरेचसे वैज्ञानिक प्रयोग करून चमत्कार घडविले. ऋग्वेदात कमूंची स्तुती सात विविध ऋषींनी केलेली आढळते. त्यात त्यांनी दोन अब निर्माण केले. उत्तम रथ बनवून अश्विनींनी दिला. खूप दूध उत्पादन करणारी गाय निर्माण केली. त्यांनी अलौकिक बुध्दिने आपल्या वृध्द मातापित्यांना पुन्हा तरूण बनविले. त्वष्टाने जो 'चमस' (सजीव पेशी) निर्माण केला, त्याचे त्यांनी चार चमस बनविले. (क. १२०). तसेच कग्वेदात ११०, ११,   १६१, ३-६०, ४-३३, ३४, ३५, ३७: ७-४८, १०-१७६ अशा काही सूक्तात ऋमूंचा उल्लेख येतो. ऋभुनी वृष्द मातापित्यास पुन्हा बौवन दिले. हा उल्लेख १-१११-१ पुन्हा आला आहे. तसेच तो ४-३३-३ मध्येही आहे. वार्धक्यामुळे खांबाप्रमाणे पडून राहणा-या पितरांना पुन्हा जवान केले. हे विधान आठ ठिकाणी आलेले आहे. यावरूनच त्यांचे औषधी क्षेत्रातील प्राविण्य लक्षात येते.
 
शुक्राचार्याची ययातिला पुनर्योवन मिळवून दिले
शुक्र हे दैत्यांचे गुरू. इन्द्रकन्या जयंतीपासून यांना देवयानी नावाची कन्या झाली. कच हा देवगुरु बृहस्पति यांचा मुलगा, देव व असुर लढाईत मृत असुरांना शुक्राचार्य आपल्या संजीवनी विद्येने जिवंत करीत. ती विद्या गुमरूपाने मिळविण्यासाठी कच शुक्राचार्यांच्याकडे गेला असता शुक्रकन्या देवयानीचे मन त्याच्यावर जडले. ती विद्या प्राप्त झाल्यावर कच परत जाण्यास निघाला. तेव्हा देवयानीने त्याच्याशी विवाहाचा आग्रह धरला. परंतु 'मी तुला बहिण मानतो. असुरांनी मला ठार केले होते. गुरूंनी मला आपल्या विद्यद्येने जिवंत केले आहे, तेव्हा से पिताश्री ठरतात. असे सांगून तिची मागणी अमान्य केली.
 
असुर राजाची कन्या शर्मिष्ठा हिने एकदा देवयानीला विहिरीत ढकलले. तेव्हा नहुषपुत्र ययाति राजाने तिला वर काढले. नंतर तिच्याशीच ययातिने विवाह केला. देवयानीच्या सांगण्यावरून वृषपर्क असुरराजाची कन्या सर्मिष्डला ययातिकडे दासी म्हणून रहावे लागले. पुढे क्यातिचे मन शर्मिष्टवर बसले व तिच्याशीही त्याने विवाह केला. तेव्हा शुक्राचार्यांनी रागावून ययातिला तू वृध्द व विकल होशील' असा शाप दिला. पुढे त्याला उःशाप दिला की, 'आपले वार्धक्य तुला काही काळपर्यंत दुस-बास देता येईल. मात्र खूप उपभोग घेऊनही ययातिच्या वासना ओसरल्या नव्हत्या. मग वाक्य आले. व   स्त्रियांचा उपभोग घेणे अशक्य झाले. त्यामुळे त्याने आपल्या पुत्रांना त्यांचे तारुण्य मागितले. देवयानीचे यदु व तुर्वसु पुत्र आणि शर्मिष्ठाचे द्रतु, अंतु व पुरू, यात पुरू या ययाति व शर्मिष्ठा यांच्या कनिष्ठ पुत्राने पित्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्यास दिले. इतरांनी नकार दिला. एक हजार वर्षानंतर ययातिने त्याचे तारूण्य त्यास परत दिले व त्यास राज्यावर बसविले. कैारव व पांडव हे यांच्याच वंशातील होत. तर यदु ययाति व देवयानी यांचा ज्येष्ठ पुत्र. बादव कुळाचा मूळ पुरुष, वरील घटनेत तारूण्य व वार्धक्याची अदलाबदल म्हणजे नेमके काय हे महाभारतात दिलेले नाही. मात्र वैज्ञानिक दृष्ट्या विचार करता पुरुने ययातिला तारूण्य दिले, म्हणजे आपल्या वृषाणातील अंडकोश म्हणजे Testicles. Testes' कातून बापास दिल्या, त्यातील -पवीसशप वा Hormone मुळे तारुण्य टिकते, त्याकाळी अंडकोश रोपणाची शस्रक्रिया झाली असावी, ययातीचे समाधान झाल्यावर एक हजार वर्षांनी म्हणजे १ वर्षान (सत्ययुगातील हजार वर्षे म्हणजे एक वर्ष) पुन्हा बापाने मुलास अंडकोश परत केले. म्हणजे पुनः Testicular Implant केला, व पुरुस तारुण्य मिळाले. अर्थात शुक्राचार्यांनी हे सर्व घडविले. ही कथा महाभारत आदि पर्व अ.८४ तसेच श्रीमद भागवत ९/१९ येथे आलेली आहे.
 
येथे एक दुसरे उदाहरण म्हणजे, इंद्राने गौतम पत्नी अहिल्येला फसवून तिच्याशी संभोग केला, तेव्हा गौतमाने चिडून इंद्राचे वृषण तोडले. तेव्हा 'देवकार्य साधण्यासाठी मी हे कर्म केले.' असे इंद्र देवांना सांगू लागला. तेव्हा अश्विनीकुमारांनी इंद्रास बोकडाचे वृषण वसविले. त्यानंतर इंद्र जगला. मात्र या घटनेनंतर त्याचा पराक्रम लोप पावला. म्हणजेच बोकडाचे वृषण इंद्रास 'Androgem म्हणजे मध्ये केला आहे. पुढे ही तारुण्य वीररस पुरवू शकले नसावे. ब्रह्मर्षांनी हा खुलासा 'वैदिक विज्ञान  काही संकलीत माहिती आहे.
अंतराळात प्रकाश गतीने गेल्यास आयुष्य वाढते : एक विज्ञानकथा भागवत स्कंध ९, अ.२ श्लोक २७-३६ येथे एक कथा आली आहे. रेवताचा पुत्र रैवत (ककुयी). त्याची कन्या रेवती, उपवर झाली तेव्हा तिला पति मिळेना म्हणून रैवत तिला घेऊन ब्रह्मदेवाकडे सत्यलोकी (ब्रह्मलोकी) गेला. तेथे तो क्षणभर थांबला. ब्रह्मदेवाचे लक्ष्य तिकडे जाताच त्याने सांगितले की, रैवता! शेषाने पृथ्वीवर बदुकुलात बलरामाचा अवतार घेतला आहे. त्याला आपली कन्या अर्पण कर. तो महापराक्रमी, सत्वशील आहे. मात्र तुझ्या मनात जे होते. ते केव्हाच मेले आहेत. कारण पृथ्वीवरची सत्तावीस चतुर्युग संपलेली आहेत. तेव्हा तू बलरामाला रेवती दे. मग रैवत राजा रेवतीला घेऊन पृथ्वीवर आला. त्याला सर्व जग नवीन दिसू लागले. त्याचे प्रपौत्र वा गोत्रही उरलेले नव्हते. तेव्हा त्याने बलरामारास लमात रेवती दिली.
 
रैवत व रेवती पृथ्वी सोडून ब्रह्मलोकी अन्य ग्रहावर गेले. ब्रह्मलोकावर ब्रह्माचे स्वामीत्व असणारा लोक म्हणजे 'अभिजित हा तारा वा याच्याजवळचा एखादा ग्रह असावा. या अभिजित नक्षत्राची देवता 'ब्रह्मा' आहे. अभिजित नक्षत्र पृथ्वीपासून २६ प्रकाशवर्ष दूर आहे. तेथील 'एक क्षण' हा पृथ्वीवरील २७ चतुर्यंगाबरोबरचा होता. युग हे दोन वर्षांचे असते. चतुर्युग म्हणजे आठ वर्षे होय. या हिशेबाने २७ चतुर्युगे म्हणजे २१६ वर्षांचा काळ ठरतो. तितका काळ उलटला तरी रेवती तरुणीच राहिली होती. व रैवतही होता तसाच होता. म्हणजेच अंतराळात आयुष्य चाहते, मृत्यू बांबतो व काळ लांबतो. असे महीं व्यासानी येथे सांगितले आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक ग्रहावरचा काळ वेगवेगळा असतो. हे व्यासांना ज्ञात होते. हे येथे सिध्द होते.
 
प्रकाशगतीने अंतराळात गेल्यास काळ वाढतो.   असा आइन्सटाइन याने सिध्दांत मांडलेला आहे. मेसॉन सारखे परमाणू हे पृथ्वीबाहेरून अंतराळातून अनेक दिवस प्रवास करून पृथ्वीवर येतात. त्यांचे आयुष्य सेकंदभरच असते. सेकंदात असणारे त्यांचे आयुष्य वाढण्याचे कारण प्रचंड गती आणि गुरुत्वाकर्षण रहित अंतराळातून प्रवास हेच असते, असे आधुनिक विज्ञान म्हणते. हा प्रयोग साध्य करण्यासाठी अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठात प्रकाशगतीने जाऊ शकेल असे यान बनविण्याचा प्रकल्प आहे. अमेरिका १३ कोटी डॉलर्स खर्च करून आइन्स्टाइनच्या सिध्दान्तावर काम करणार आहे. अशी १८ एप्रिल १९८४ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आहे. तर ५ मे १९८४ च्या त्याच वृत्तपत्रात बातमी आहे की, रशियन शास्रज्ञांनी अभिजित नक्षत्राभोवती ग्रहमाला आहे, हे शोधले आहे. अभिजित तारा आपल्या सूर्वाप्रमाणे सावकाश फिरतो. मग पूर्वीच्या ऋर्षीनी अभिजित नक्षत्राभोवतीला ब्रह्मलोक (सत्यलोक) हे नांव योजले असावे. मग रैवत रेवतीस घेऊन २६ प्रकाशवर्षे दूर गेला, असे दिसते.
 
नाभिः निरभिद्यत ।
नाभ्याः अपानः ।
अपानात् मृत्युः ।
ऐतरेय उपनिषद । ।१.१.४।।
 
नंतर नाभी उत्पन्न झाली. नाभीपासून अपान व अपानापासून मृत्यू उत्पन्न झाला. नाभी दुस-या मासात उत्पन्न होते. ती उत्पन्न होण्यापुर्वी एक पेशी विभागून दोन पेशी असे पेशींचे विभाजन जोरात चालू असते. नाभीने अन्नरस व प्राणवायु पुरविला नाही तर पेशी मरतात. 'अपान' शब्द अप म्हणजे खाली, आन म्हणजे नेणारा या अर्थी आहे. अपान हा खाली नेणारा वायु असून पचन घडविणारा, मोठे अणू छोटे करणारा, अन्तरसातीत्त रेणूना तोडणारा व शरीरासही खाली नेणारा म्हणजे मृत्यूकडे नेणारा वायु असतो. म्हणजेच आम्रपचनानंतर देहातील मल बाहेर टाकण्याचे कार्यही अपानच करतो. रेतविसर्जन, गर्भविमोचन, मलमूत्र विसर्जन यांच्याप्रमाणे    प्राणमय कोशसुध्दा स्थूलदेहाबाहेर काढण्याचे काम अपान करतो. म्हणजेच मृत्यू अपानामुळे घडतो. मात्र या कार्यास पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सहाय्यभूत होते.
 
'पृथिव्यां या देवता सैषा
पुरुषस्यापानमवष्टभ्यान्तर...।।
' प्रश्नोपनिषद ३.८
 
'पृथ्वीमध्ये जी देवता असते ती अपानास आकर्षन सहाय्य करते.' असे पिप्पलाद मुनी येथे सांगतात. तसेच 'पायुपस्थेऽपानं.. '३.५ पायु व उपस्थ येथे अपान असतो असे म्हटले आहे, अपानाचे कार्य खाली खेचण्याचे आहे. तसेव पृथ्वीचे गुरुत्वाकर्षणही तेच करते. आद्य शंकराचार्य म्हणतात, 'पृथ्वीच्या देवतेने अपानास सहाय्य करून खाली ओढून धरले नसते तर हे स्थूल शरीर अंतरिक्षात कुठेही गेले असते,' शंकराचार्यांचा काळ इ.स. ८०० मानला जातो. म्हणजे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिध्दान्तापूर्वी एक सहस्र (हजार) वर्षे शंकराचार्य झाले आहेत. ख्रिस्तपूर्व 'सिध्दांत शिरोमणी' ग्रंथात सांगितले आहे -
 
आकृष्टशक्तिश्च मही तया यत् स्वस्थं गुरू स्वाभिमुखं स्वशक्त्‌या ।
आकृष्यते तत् पततीव भाति ।।
 
पृथ्वी (मही) च्या ठिकाणी असणाऱ्या आकृष्टशक्तीमुळे म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तिच्या आकर्षणात येणा-या (स्वाभिमुखं) द्रव्यांना, स्वतःच्या शक्तीने आकर्षित करून घेते, त्यामुळे ते द्रब्य खाली पडल्यासारखे भासते... तर गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत न्यूटनपूर्वी कित्येक शतके अगोदर भारतीयांनी सांगितला आहे.
 
मानवी देहस्थिती व गुरूत्वाकर्षण-
आपले शरीर सातत्याने गुरुत्वाकर्षण प्रभावाने पृथ्वीकडे खेचले जाते. त्या कारणानेच शरीराला वार्धक्य येत राहते. मग आपण बसून राहिलात, झोपून राहिलात वा कार्यरत असाल तरी ७०-८० वर्षांनी शरीराला   वार्धक्य म्हणजे म्हातारपण येते. आपले शरीर पृथ्वी जल-तेज-वायु आकाश असे पंचमहाभूतात्मक असून ते परत पृथ्वीच्या आकर्षणाने मूळस्थानाकडे जाते. सात्रज्ञ म्हणतात की, प्रत्येक वस्तू आपल्या मूळस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करते, शरीरात प्राणविद्युत कार्यरत असते. ती वर्तुळाकार चाहात असता शक्ति हास होत नाही. वर्तुळ खंडित वा तुटलेले असेल तर शक्ति -हास होतो. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवून, दोन्ही हात एकमेकांवर ठेवून शांतपणे निश्चल बसले असता सरीर ऊर्जेचा कमीत कमी वापर होतो. तसेच गुरुत्वाकर्षणाचा कमीत कमी परिणाम होतो. अशावेळी फक्त मेरूदंडतळाशी असणा-या बिदूवरच गुरुत्वाकर्षण काम करते.
 
मात्र मेरुदंड बेड्यावाकड्या अवस्थेत पुढे चा मागे झुकलेला असेल तर पूर्ण मेरूदंड त्या बिंदूकडे खेचला जातो. परिणामी खूप परिश्रम पडते व या श्रमात जी वेदना होते ती गुरुत्वाकर्षणामुळेच होय. म्हणून जर मनुष्य चंद्रावर जाऊन राहिला तर त्याचे आयुष्य 'सहा' पटीने वाढेल. कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण (Gravitation) सहा पटीने कमी आहे.
 
जरायु वार्धक्य व आधुनिक विज्ञानः
आज जराविज्ञान किंवा जरावैद्यक म्हणजे वार्धक्य विचारांचे एक 'GERI-TRICS' शास्त्र निर्माण झाले आहे. बातील 'GER' म्हणजे 'जरा' म्हणजे 'Old age' हे संस्कृत मूलोद्भव होग. तर latrics = medicine म्हणजे औषध, आपले शरीर कोट्यावधी पेशींनी बनलेले असते. या पेशींमुळेच आपण जगू शकतो. आनंद उपभोगू शकतो. आपण जे काही खातो त्यातील पौष्टिक सत्व घेऊन ऊर्जे त रूपांतर करणे व चाकीच्याचा मल वा विष्ठा बनविण्याचे कामही या पेशीच करतात, आपणास तहान, भूक पेशींमुळेच लागते. कोट्यावधी पेशी रोज मरत असतात व तशाच नवीन पेशीही तयार होत असतात. मात्र प्रत्येक पेशी जिवत असते असे नाही. आपल्या कातडीच्या पेशी   मेलेल्या असतात. आपण कमीत कमी २ किलोच्या मृत पेशींची कातडी बाळगून सगळीकडे वावरत असतो. या अब्जावधी मृतपेशी होत.
 
यकृतादिंच्या काही पेशी सोडल्यातर जिवंत पेशींचे आयुष्य १ महिण्यापेक्षा कमी असते. मात्र मेंदूच्या पेशी, ज्या जन्मावेळी १ लाख कोटी मिळतात तेवढयाच असतात, त्यानंतर त्या मिळत नाहीत, तर दर तासाला ५०० या वेगाने त्या नष्ट होतात. पण मेंदू सोडून उरलेल्या पेशीतले अवयव मात्र सातत्याने नवनिर्मितीत गुंतलेले असतात. शरीरात मेंदू वगळता अशी एकही पेशी वा रेणू असा नाही की जो ९ वर्षांपूर्वीचा आहे. पेशींच्या दृष्टीकोनातून आपण कायम तरूणच असतो. हृदय, अस्थि, मज्जातंतूतील पेशींचे विभाजन होत नसते. प्रत्येक पेशीमध्ये आपली सगळी माहिती साठवून ठेवलेली असते. ही सूचनावली 'Instruction Manual हे 'Genes' च्या स्वरूपात प्रत्येक पेशीत असते. प्रत्येक पेशीत बीज तयार होते. पेशीबाहेर Membrane पडदा व आतमध्ये Nucleus (गाभा) असून मध्ये 'Cytoplasm अशी रचना असून पेशींचा पडदा Lipid' नावाच्या स्निग्ध पदाथनि बनलेला असतो. यातच 'प्रोटीन्स' असतात. ते बीस एक हजार त-हेचे असतात. या प्रोटीन्समुळे आपले आयुष्य नियंत्रित होते. ऐकू येणे, वेदना होणे, डोळे, केस, कातडीचा रंग, हे प्रोटीन्समुळे घडते. हे प्रोटीन्स म्हातारपणामुळे चनण्याचे थांबले तर केस पांढरे होणे घडू लागते. भूक लागणे, अन्न पचन हे ऊर्जानिर्मिती होऊन शरीरभर नेणे हे प्रोटीन्नाच घडविते. प्रत्येक पेशीत हजार एक Mitochondria' नावाची 'Powerstations' असतात. ते 'Genetic Code' प्रमाणे वागतात. प्रत्यक्ष अवयव तयार होण्याच्या बाल्यावस्थेतील पेशींना 'Stem Cells' म्हणतात. त्यात अवयव कसे बनवायचे याचा आराखडा असतो. या काढून जतन केल्यातर त्याच माणसाचे Spare Parts बनविता येतील. असे 'Stem Cell Theory सांगते. संशोधन सुरू आहे.
 
'Aging Genes' च्या जन्मवेळच्या   "blueprint आराखडाधानुसार 'Mitosis' ने एका पेशीचे दोन, दोनाचे चार असे करीत पेशी वाहतात. व नंतर धांबतात. शरीरातील अतिरिक्त विपुल शर्करा (Sugar) ही वयोवर्धनास (aging process) महत्त्वाची कारणीभूत ठरते. ती प्रोटीनबरोबर सहजगत्या मिसळून पेशींतर्गत व बाहेर प्रभाव दाखवून शरीरातील अवयवांचे काठीण्य वाढविते. अर्थात् अवयवांचा लवचिकपणा कमी होतो. परिणामी वृध्दत्व येते. ज्यांना मुक्ताणू (Free Radicals) असे संबोधले जाते ते अणू आपल्या शरीरात सतत तयार होत असतात, त्यांचा अपाय टाळण्यासाठी शरीरात 'anti - Oxidants' अणू कार्यान्वित होत असतात. या दोघात समानता असणे निरामय आरोग्याचे लक्षण असते, प्रत्येक पेशीच्या चयापचयात Free Radicals' निर्माण होतात. त्यामध्येच धूम्रपान, स्वयंचलित चाहनांचा धूर प्रदूषित अन्न, प्रदुषित पर्यावरण इ. ची भर पडत असते. या मुक्ताणूंचा परिणाम शरीरातील प्रत्येक अणू-रेणूंवर, प्रथिनांचर, स्निग्ध पदार्थावर, पेशीमधील DNA. या अतिमहत्त्वाच्या रेणूंवरही होतो. या परिणामाचा अतिरेक म्हणजे पेशीचा मृत्यू, मुक्ताणूंचा अपाय टाळायचा असेल तर आहारातून Vitamin E, Vitamin C, beta-carotene आणि Selenium अशा anti-Oxandats चा समावेश व्हावा, असे विज्ञान सांगते. तर व्याधिप्रतिकार शक्ती व नैसर्गिक (Immune System) शक्ती कमी झाल्याने 'त्यामुळेचं' शरीरस्थ पेशींवस हल्ला होतो. पेशीतील बदलच पेशीच्या नाशास कारणीभूत होतो व वृध्दत्व झपाटयाने येते, असे 'Immune Theory सांगते. तर गेल्या २० वर्षात सर्वाधिक चर्चिला जाणारा शास्त्रीय संशोधनाचा विषय म्हणजे 'anti-Oxidant' होय. कारण शरीरातील बहुविध विकृतींना कारणीभूत असणारे मुक्ताणू (Free radicals) पासूनचे परिणाम टाळण्यासाठी हे आवश्यक आहेत. मुक्ताणूचा संबंध हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत, त्वचारोगापासून वार्धक्यापर्यंत सर्वत्र आहे.
आपल्या शरीरात सर्वत्र 'Oxidation' च्या लाखो  प्रक्रिया सातत्याने चालू असतात. या होत असताना अभावितपणे Free Radicals' सुध्दा निर्माण होतात. त्याही ज्वालेकरोबर ठिणग्या उडतात त्याप्रमाणे हे घडते.
 
या फ्री रॅडिकल्समध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असल्याने ते अत्यंत अस्थिर असतात. अन् तो मिळवायला ते धडपडतात, पेशीतील घटकांतून तो इलेक्ट्रॉन जेव्हा Free Radical ला मिळतो, तेव्हा त्याचे अस्तित्व संपते. तेव्हा ज्या घटकातून त्याला Electron मिळाला तो घटक 'Free Radical बनतो. मग अशा प्रकारे ही साखळी प्रक्रिया चालू राहते, व पेशीमधील महत्त्वाच्या घटकांचा Oxidation मुळे नाश झाल्याने पेशीचे कार्य बिघडते. अर्थात आपले आरोग्य बिघडते. या उलट काही महत्त्वाची कार्य Free Radicals' मुळे होतात.
 
उदा. 1) 'Genes' ची चुकीची कार्यप्रणाली बदलणे. 2) विविध विषाणूंच्या संसर्गाला प्रतिकार करण्यास आवश्यक सामग्री गोळा करणे. 3) रसरक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यात 'Nitric Oxide' चा सहभाग असतो. हे एक Free Radical आहे. मुक्ताणू कर्करोगकारक गुणविधी सूत्रे (Genes) निष्प्रभ करून कर्करोगविरोधी गुणविधीसूत्रे प्रभावित करतात. मात्र गरजेपेक्षा जास्त तयार होणा-या मुक्ताणूंच्या दुष्प्रभावापासून बचाव करण्यासाठी anti-Oxidant चा आहार अत्यंत उपयुक्त ठरतो. सद्यःस्थित तणावयुक्त धावपळीची दैनंदिन आहार-विहार दिनचर्या, हवापाणी दूषित पर्यावरण, अन्नपदार्थातील मानवनिर्मित रसायनांचा वापर, कृत्रिम धाग्यांचा पोशाख, कृत्रिम प्रकाशात वावरणे, ध्वनिप्रदूषण, किरणोत्सर्ग, शेतीतील कीटकनाशकांचा वापर इ. बाबीमुळे मनुष्य निसर्गापासून दूर चालला असून मग मुक्ताणूच्या हानीमुळे आजार साथीप्रमाणे पसरत आहेत. (क्रमश:)
Mo. 9421126350.
Powered By Sangraha 9.0