आरोग्य चिंतन मासिकाला महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालयाची शिफारस

31 Jan 2026 11:10:53
 
DOL
नाशिक येथून ऑक्टोबर 2018 पासून नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत मार्गदर्शक असणाऱ्या आरोग्य चिंतन या मासिकाची शिफारस महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाच्या निवड समितीने केली असल्याचे वृत्त आहे.
 
सदर शिफारसीनुसार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ग्रंथालय संचालनालयाकडून अनुदान मिळणाऱ्या सर्व शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथालयांसाठी आरोग्य चिंतन हे नियतकालिक रुपये 300 वार्षिक वर्गणी भरून सुरू करावे अशा आशयाची ही शिफारस आहे.
 
आरोग्य चिंतन प्रमाणेच एकूण 36 नियतकालिकांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला असून आता आरोग्य चिंतन हे मासिक महाराष्ट्रातील सर्व अनुदानित ग्रंथालयांपर्यंत पोहोचू शकणार आहे.हे मासिक गेल्या 8 वर्षांपासून नाशिक येथून प्रकाशित होत असून त्यामध्ये आयुर्वेद ,ऍलोपॅथी, होमिओपॅथी ,योग आहार अशा विविध विषयांवर अत्यंत सोप्या भाषेत आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जाते.
 
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक शाळा, महाविद्यालय तसेच शिक्षक ,प्राध्यापक, कामगार ,राजकीय कार्यकर्ते दुकानदार, व्यावसायिक अशा समाजातील विविध घटकांपर्यंत तसेच डॉक्टर्स ,वकील, इंजिनियर ,आर्किटेक्ट या व्यावसायिकांपर्यंत सदर मासिक सध्या मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे .
 
या मासिकाचे संपादक नाशिक येथील आयुर्वेद चिकित्सक वैद्य विजय कुलकर्णी हे असून कार्यकारी संपादक म्हणून श्री. रवींद्र अमृतकर हे कार्य करीत आहेत. संपादक मंडळामध्ये डॉ. गोपाल सावकार ,डॉ. गिरीश शाकुंतल डॉ.प्रज्ञा कुलकर्णी डॉ.स्वानंद सोनार, डॉ. नीलिमा राजगुरू यांचा समावेश आहे. तसेच कोकण विभाग प्रमुख म्हणून वैद्य सुविनय दामले हे देखील कार्य करीत आहेत. या मासिकाच्या प्रकाशिका म्हणून सौ. योगीता अमृतकर आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून प्रा. सौ. अनिता कुलकर्णी व प्रा. सागर कुलकर्णी हे कार्य करीत आहेत. मासिकाचे जाहिरात आणि विक्री व्यवस्थापक म्हणूनश्री.भारत माळवे आणि कार्यालयीन सहाय्यक म्हणून सौ. पूनम पगारे हे कार्य करीत आहेत.
 
या मासिकाच्या वर्गणीसाठी आमच्या वेबसाइट वर subscribe करावे किंवा  9822075 021 या मोबाइलला क्रमांकावर संपर्क करावा.
Powered By Sangraha 9.0